Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

कालावल खाडी पात्रातील 'त्या' तीन वाळू गटाचे लिलाव नको

कालावल खाडी पात्रातील 'त्या' तीन वाळू गटाचे लिलाव नको

खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांनी वेधले प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : कालावल खाडी पात्रातील अति संवेदनशील वाळू गट बी व उपगट बी 4 व बी 5 या वाळू गटाचे लिलाव होऊ नये. अशी मागणी खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कालावल खाडीपात्रात अतिशय संवेदनशील अशी परंपरागत मनुष्य वस्ती, जैवविविधतेने संपन्न असणारी बेटे आहेत. या वाळू गटाच्या नजीकच पांडवकालीन बंधारा आजही अस्तित्वात आहे. मालवण तालुक्यात येणारा पर्यटक मोठ्या संख्येने या बेटांना व पांडवकालीन बंधारा बघण्यासाठी या भागात येत असतात. खाडीपात्रात अनेक मत्स्य बीजे, कांदळवन आजही अस्तित्वात आहे.

वाळू उत्खननामुळे या भागातील जैवविविधता संपूर्णतः नष्ट होणार असून पांडवकालीन बंधाराही नष्ट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या बंधाऱ्यामुळेच गड नदीचा प्रवाह कालावल खाडीपात्रात काही प्रमाणात रोखला जाऊन या भागातील बेटे सुरक्षित आहेत. परंतु या भागात वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणे होऊ लागल्यास हा पांडवकालीन ठेवा नाहीसा होऊन खाडीपात्रातील बेटे ही नाही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सततचा वाळू उपसा यामुळे बेटांची प्रचंड हानी होत आहे. या वाळू गटाच्या जवळच कालावल ब्रिज असून अति वाळूउपसामुळे या ब्रिजला सुद्धा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

आम्ही बेटावरील ग्रामस्थ आपणास नम्रतापूर्वक विनंती करतो की, या वाळू गटांचे लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबून अनधिकृत वाळू उपसाही रोखण्यात यावा ही विनंती करण्यात आली आहे.

rapan bottom