शानू वालावलकर | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आंबडोस गावाचे दैवत श्री देव रवळनाथ देवाचा जत्रोत्सव गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या निमित्त धार्मिक कार्यक्रम तसेच सकाळपासुन ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री पालखी सोहळा, त्या नंतर बाळकृष्ण गोरे दशावतार यांचा नाटक, पहाटे गाडगे फुटणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आंबडोस श्री रवळनाथ देवाचा उद्या जत्रोत्सव
