आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे 50 लाख निधी मंजूर
शिवसेना मच्छीमार आघाडी मालवण शहर प्रमुख वसंत गावकर यांची माहिती
आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मानले आभार
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना 25-26 अंतर्गत मालवण शहरात अनेक विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. चिवला बीच निलरत्न बंगला ते नाथ पै. सेवांगण पर्यंत रस्ता दुरुस्ती करणे या कामासाठी सुमारे 24 लाख 99 हजार निधी तर चिवला बीच कुरण ते नाथ पै. सेवांगण पर्यंत रस्ता दुरुस्ती करणे या कामासाठी ही सुमारे 24 लाख 99 हजार असा एकूण 50 लाख निधी मंजूर झाला आहे. याबाबत माहिती शिवसेना मच्छीमार आघाडी मालवण शहर प्रमुख वसंत गावकर यांनी दिली आहे. दरम्यान, महत्वाची आणि आग्रही मागणी असलेले जनहीताच्या दृष्टीने महत्वपूर्ण असे हे काम मंजूर झाल्याबद्दल वसंत गावकऱ यांनी आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.

