Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव 5 नोव्हेंबर रोजी

मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव 5 नोव्हेंबर रोजी

मालवण : मालवणचे अग्र नामांकित ग्रामदैवत देऊळवाडा येथील श्री देव नारायण प्रतिवार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव बुधवार 5 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.

मंदिर व उत्सवा बाबत माहिती

श्री देव नारायण मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुर्मिळ अशी अत्यंत सुबक श्री देव नारायणाची द्विभुज मुर्ती आहे. मुर्तीच्या हातामध्ये अन्न आणि उदक आहे. जवळ गरुड व हनुमंत यांची मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला शिवभक्त मार्कंडेय ऋषींची मुर्ती व शिवलिंग तर डाव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या बाहेर महागणपतीची मूर्ती व मारुतीची मूर्ती आहे. तसेच श्री देव नारायण पादुका व सूर्यनारायणाची मूर्ती आहे. मंदिरात रोज सकाळी व संध्याकाळी पूजा होते. मंदिर दररोज सकाळी ८.०० वाजल्यापासुन रात्री ८.०० वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते. देवस्थानमधील प्रत्येक उत्सवाची सुरुवात प्रथम श्री देव नारायणास श्रीफळ ठेवुन सांगणे करून केली जाते. असे हे अग्रनामांकित ग्रामदैवत श्री देव नारायण म्हणजे विष्णूची मुर्ती असल्यामुळे मंदिरावर ठिकठिकाणी तुळशी वृंदावने आहेत. या मंदिरात देवाला गुळ-खोबरे ठेवण्याची प्रथा आहे. मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा पहाटे ५.०० वाजता काकड आरती असते. व संध्याकाळी पुराण वाचन केले जाते.

त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दिपोत्सव यादिवशी दुपारी समाराधना रात्री १० वाजता पुराणवाचन सांगता नंतर दिपोत्सव. मंदिर व मंदिराच्या कळसांवर कोहाळ्याचे दिवे करून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी या पाचही मंदिरावर दिप लावून दिपोत्सव साजरा. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व मिरवणुक केली जाते. रात्रौ १२.०० वाजता गोरेदशावतारी मंडळाचे नाटक व पहाटे दहीहंडी वगैरे देवस्थानचे कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाला रात्री ९.०० वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवाजी महाराजांचा राजदंड (चांदीचा) या उत्सवाला किल्ल्यावरील मानकरी वाजत-गाजत किल्ल्यावरून घेऊन येण्याची प्रथा आहे. ते उत्सव समाप्तीनंतर सकाळी मानाचे श्रीफळ (प्रसाद) घेऊन मार्गस्थ होतात. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा व उत्सवाची शोभा वाढवावी अशी देवस्थान ट्रस्टतर्फे नम्र विनंती आहे.

rapan bottom