Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

Malvan | रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवा

Malvan | रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवा

सौं. शिल्पा यतीन खोत यांनी वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष

नागरिक व वाहन चालक यांना होणाऱ्या त्रासाबाबत मांडली भुमिका

मालवण : मालवण शहरातील प्रमुख रस्त्यांची अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहन चालक तसेच नागरिकांना या खड्डेमय रस्त्यांमुळे त्रासाला सामोरे लागत आहे. तरी रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवण्यात यावेत अशी लक्षवेधी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, शहरातील स्वामी हॉटेल, सरस्वती टॉकीज, लिमयें हॉस्पिटल, बसस्थानक ते देऊळवाडा मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे.

पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या मालवण शहरातील या रस्त्यांची अवस्था पर्यटनाला परिणाम करणारी तसेच वाहन चालक व स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. या मार्गांवरून रोजचा प्रवास करणाऱ्या आमच्या मालवणातील स्थानिकांना या खड्ड्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपघातही घडत आहेत. रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना धुळीचाही त्रास सहन करावा लागतो. जनता पूर्णपणे त्रस्त आहे. तरी तात्काळ याची दखल घेऊन खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवून रस्ता सुस्थितीत करावा.

अन्यथा मालवण वासियांकडून आंदोलनाचा मार्गाचा अवलंब केल्यास त्याला सर्वस्वी आपला विभाग जबाबदार असेल. तरी तात्काळ कार्यवाही व्हावी. असे लक्षवेधी निवेदन नागरिकांच्या वतीने शिल्पा खोत यांनी बांधकाम विभागास दिले असून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

rapan bottom