Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

समाजसेवक शांताराम उर्फ बाळा गोसावी यांचे निधन.

समाजसेवक शांताराम उर्फ बाळा गोसावी यांचे निधन.

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मेढावाडी गावचे सुपुत्र, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम उर्फ बाळा नारायण गोसावी ( 60 वर्ष ) यांचे रविवारी रात्री उशिरा मालवण येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. सोमवारी सकाळी मुंबई मिरा रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिका मध्ये टाऊन प्लॅनिंग विभागात अधिकारी म्हणून ते काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. बाळा गोसावी यांच्या निधनाने मसुरे गावावर शोककळा पसरली आहे.

शांताराम गोसावी हे बाळा या टोपण नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. निस्सिम साई भक्त म्हणून त्यांची परिसरामध्ये ओळख होती. कोरोना कालावधीत अनेक रुग्णांची सेवा करण्यासोबतच अनेक गरजवंत कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात उपलब्ध करून दिला होता. साईनाथ भक्त मंडळ मसुरे मेढा वाडीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. अनेक प्रशालेंच्या विविध गरजा आपल्या दानशूर व्यक्तिमत्त्वातून पूर्ण करून दिल्या होत्या.
मसुरे गावाच्या सामाजिक, कला, क्रीडा,धार्मिक, पर्यटन, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे बहुमूल्य असे योगदान होते. कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेणे, अनेक गोरगरीब रुग्णांना सहकार्य करणे, अनेक वृद्धांना खावटी स्वरूपात मानधन त्यांनी दिले होते. अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष महाराष्ट्र कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती भारतीय जनता पार्टी सेलचे ते राज्य उपाध्यक्ष होते. विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले होते. मसुरे गावातील अनेक तरुणांना त्यांनी मुंबईमध्ये रोजगाराची संधी निर्माण करून दिली होती. दरवर्षी पाचशे गरीब विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक मदत करत होते. साई पुण्यतिथी उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी मसुरे गावामध्ये अनेक समाजीभमुख उपक्रम दरवर्षी राबविले होते. सिंधुदुर्गामध्ये राज्य, आंतरराज्य विविध कॅरम स्पर्धा पुरस्कृत करून सिंधुदुर्गातील क्रीडा प्रेमींना आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. प्रतिवर्षी मोफत आरोग्य शिबिरे भरवून सिंधुदुर्गा सहित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांना हक्काचा आधार मिळवून दिला होता. मुंबई महानगरपालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावरती त्यांना अनेक राज्य आंतरराज्य पुरस्कार मिळाले होते. गोरगरिबांचे पाठीराखे म्हणून त्यांची संपूर्ण मसुरे गावामध्ये ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहिणी असा मोठा परिवार असून भारतीय कॅरम ज्युनियर संघाचा माजी कर्णधार नॅशनल कॅरमपट्टू वरुण गोसावी आणि मिरा रोड येथील डॉक्टर नेहा गोसावी यांचे ते वडील होत.

rapan bottom