आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली युवासेना दिलेली जबाबदारी पार पाडणार
मालवण : आगामी नगरपरिषद तसेच जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी युवासेना सज्ज आहे. असे प्रतिपादन युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, शहर प्रमुख दीपक पाटकर, सरपंच संघटना तालुका प्रमुख शाम वाक्कर यांच्या मार्गदर्शनात युवासेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी संघटनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नवीन नियुक्ती देण्यात आल्या.
यावेळी युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, तालुका प्रमुख स्वप्निल गावडे, तालुकाप्रमुख अभी लाड, शहर सचिव चिन्मय तांडेल, कुडाळ मालवण विधानसभा युवा सेना अध्यक्ष प्रीतम गावडे, जिल्हा उप सचिव अक्षय तावडे, शहर प्रमुख आनंद पराडकर, उपतालुका प्रमुख सिद्धेश मसुरकर, तालुका संघटक अमोल मुळीक, उप तालुका प्रमुख संदेश वेतुरेकर, मसुरे विभाग प्रमुख धनंजय परब, सिद्धेश खेडेकर, राजू चव्हाण, जीवन प्रभू यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

