Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांनी दिलेला शब्द पुर्ण केला…!

आमदार निलेश राणे यांनी दिलेला शब्द पुर्ण केला…!

मालवण शहरातील क्रीडा संकुल व विविध विकासकामांसाठी 5 कोटी निधी मंजूर

शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी नागरिकांच्या वतीने मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : गतिमान विकासाचा ध्यास घेऊन दिलेला शब्द पुर्ण करणारे नेतृत्व म्हणजे आमदार निलेश नारायण राणे हे होय. त्यांच्या प्रत्येक विकास कार्यातून जनता त्यांचे कार्य अनुभवत आहे. अनेक खेळाडू, प्रशिक्षक यांची मागणी असलेले क्रीडा संकुल आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. मालवण शहरातील क्रीडा संकुल व विविध विकासकामांसाठी 5 कोटी निधी मंजूर झाला आहे. याबाबत शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी नागरिकांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

आमदार निलेश राणे यांनी केलेल्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी एकूण ५ कोटींचा विकासनिधी राज्य नियोजन विभागातून मंजूर करण्यात आला आहे. यात आमदार निलेश राणे यांची महत्वपूर्ण मागणी आणि मालवण शहरवासीयांना आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. क्रीडा संकुल मंजूर झाले असून सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश असलेले ग्राउंड, सर्व इनडोअर-आउटडोअर क्रीडा प्रकार समाविष्ट असतील.

या क्रीडासंकुला सोबतच मालवण शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून एकूण ५ कोटींचा निधी मालवण नगरपरिषदसाठी मंजूर झाला आहे.

हा भरगोस विकासनिधी मंजूर केल्याबद्दल शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी नागरिकांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. खासदार नारायण राणे साहेब, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात काम करत असताना जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे दिपक पाटकर यांनी सांगितले.

rapan bottom