Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

निती आयोगाच्या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर मिळणार नवा आयाम -पालकमंत्री नितेश राणे

निती आयोगाच्या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर मिळणार नवा आयाम -पालकमंत्री नितेश राणे


• सिंधुदुर्ग जिल्हा देशासाठी आदर्श ठरणार

• नीती आयोग करणार AI मॉडेलचा सखोल अभ्यास

• ‘साक्षरतेपासून स्मार्ट जिल्ह्यापर्यंत’- सिंधुदुर्गचा प्रेरणादायी प्रवास

सिंधुदुर्गनगरी : देशभरात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून, या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची विशेष टीम दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली आहे.या टीमकडून जिल्ह्यातील सर्व विभागांनी AI प्रणाली कशी स्वीकारली आहे, प्रशासनातील कार्यपद्धतीत काय बदल घडले, तसेच प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यात AI कशा प्रकारे वापरले याचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर नवा आयाम मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.
नीती आयोगाच्या या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान कार्यालयाशी निगडित असलेल्या या आयोगाने सिंधुदुर्गच्या AI मॉडेलचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ देशभरात या जिल्ह्याच्या कार्यपद्धतीकडे एक "नवीन दृष्टिकोन" म्हणून पाहिले जात आहे. सिंधुदुर्ग हा केवळ पर्यटन जिल्हा नसून एक साक्षर आणि प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. AI प्रणालीच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि उत्तरदायी बनत आहे. जिल्ह्याच्या प्रतिमेवर या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होत असून, इतर जिल्ह्यांसाठी हे मॉडेल प्रेरणादायी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहा जिल्हे AI मॉडेलवर विकसित करण्याची संकल्पना मांडली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाची दखल घेऊन नीती आयोगाने येथे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मार्व्हल कंपनीच्या सहकार्याने जिल्ह्यातील AI उपक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावत आहे असेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या विकास प्रवासाबद्दल बोलताना पालकमंत्री श्री राणे म्हणाले की, 'आज सिंधुदुर्गमध्ये जे काम सुरू आहे तेच उद्या देशातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरणार आहे. भविष्यात जेव्हा इतर जिल्हे अशा प्रकारच्या प्रणाली स्वीकारतील, तेव्हा ‘AI मॉडेलचा मूळ जिल्हा’ म्हणून सिंधुदुर्गचे नाव अग्रस्थानी राहील. हे आपल्यासाठी नक्कीच भुषणावह राहणार आहे असेही ते म्हणाले.

rapan bottom