कुडाळ : आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक चंद्रशेखर रामजी राणे यांची युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चंद्रशेखर राणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

