मालवण | प्रतिनिधी : श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज सांप्रदाय, मालवण यांच्या वतीने परमपूज्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा पुण्यस्मरण दिवस शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर, २०२५ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. सांप्रदायाच्या श्रीक्षेत्र दत्तमंदिर, वायरी बांध, मालवण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पवित्र दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळ ९ वा. : परमपूज्य गुरुवर्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक करण्यात येईल. दुपार १२.३० वा. : मध्यान्न आरती. दुपार १.३० वा. : भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ. सायंकाळ ७.३० वा. : धुपारती. रात्री ८ वा. : सांप्रदायिक भजन (नामस्मरण आणि भजनाचा कार्यक्रम).
सांप्रदायाचे कार्याध्यक्ष कृष्णा वसंत बांदेकर यांनी सर्व भाविक भक्तांना सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याची नम्र विनंती केली आहे.

