Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आचरा | ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला तीव्र संताप

आचरा | ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला तीव्र संताप

मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित

आचरा, चिंदर, वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थ सहभागी

आचरा : ऐन दिवाळीपासून आचरा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात सातत्याने विजेचा लपंडावं चालू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणला धडक देण्याचा इशारा दिला होता गुरुवारी सकाळी आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयात धडक देत उपस्थित झालेल्या उपकार्यकारी अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तब्ब्ल तीन तास अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल लिंबकर यांनी ग्रामस्थांच्या असलेल्या मागण्या मान्य करून येत्या 10 दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले.

10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा पूर्वसुचना न देता उग्र आंदोलन छेडणार असल्यासचा इशारा ग्रामस्थांनी देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

आचरा सबस्टेशन मधून सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे आचरा गावासह तोंडवळी, वायंगणी, चिंदर त्रिंबक भागातील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना फटका बसला होता वीज वितरणला जाब विचारण्यासाठी आचरा पंचक्रोशी गावातील ग्रामस्थ सरपंच जेराॅन फर्नांडिस, महेश राणे,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, माजी सरपंच राजन गावकर, मंगेश टेमकर, तोंडावळी माजी सरपंच संजय केळूसकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत, डॉ प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडीं यांसह सिद्धार्थ कोळगे, गुरु कांबळी, विजय कदम, नाना पाटील, मंदार सरजोशी, उदय घाडी, समीर बावकर, जयंत पांगे, विदयानंद परब, बाळा घाडी, सुनील दुखंडे, शिंबू नायर, निखिल ढेकणे यांसह अन्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित झाले होते.

rapan bottom