Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

डिगस तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी मंजूर

डिगस तलाव परीसर सुशोभीकरणसाठी अडीज कोटींचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांचे गावाच्या वतीने निखिल कांदळगावकर यांनी मानले आभार

कुडाळ : राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून डिगस चोरगेवाडी तलाव येथे सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार प्रादेशिक पर्यटन योजनेतून डिगस चोरगेवाडी तलाव येथे उद्यान विकसित करणे, पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या पर्यटक सुविधा केंद्राचे बांधकाम करणे, गणेश विसर्जनासाठी सुसज्ज गणेशघाट जेटी बांधकाम करणे, बैठक व्यवस्था करणे व आकर्षक सेल्फी पॉईंट उभारणे या कामासाठी एकूण २ कोटी ५० लक्ष एवढ्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

डिगस चोरगेवाडी तलाव हे मुंबई-गोवा महामार्गापासून जवळ असून येथे गेल्या दोन वर्षांपासून वॉटर स्पोर्ट सुरू आहेत. त्याला पर्यटकांची चांगली पसंती मिळाली असून जर डिगस तलाव परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यास पर्यटनवाढीसोबतच डिगस गावातील तरुणांना रोजगार व ग्रामपंचायत प्रशासनाला कर स्वरूपात उत्पन्न मिळेल यासाठी निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणेंची भेट घेऊन या परिसराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली होती त्यानुसार परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर केल्यानंतर आज प्रादेशिक पर्यटन योजनेतून या कामासाठी अडीज कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. याबाबत डिगस गावाच्या वतीने निखिल कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करत या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होईल अशी माहिती दिली आहे.

rapan bottom