Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

किल्ले सिंधुदुर्ग नजीक शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील भलमोठा सांगाडा

किल्ले सिंधुदुर्ग नजीक शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील भलमोठा सांगाडा

मालवण | प्रतिनिधी : किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात गुरुवारी सकाळी भलामोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा दिसून आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तेथपर्यंत पोचणे कठीण बनले आहे.

समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. समुद्राला आलेल्या उधाणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या खडकाळ भागात एक भलामोठा कुजलेल्या अवस्थेतील शार्क माशाचा सांगाडा अडकला. सकाळी किल्ल्यातील स्थानिक रहिवासी यांना हा माशाचा सांगाडा दिसून आला. सुमारे १५ फूट पेक्षा जास्त लांबीचा हा सांगाडा असून तो पूर्णतः कुजला आहे. माशाचा तोंडाचा भाग अस्तित्वात नाही तर अन्य भागाचा सांगाडा व मांस असल्याचे दिसून येत आहे. समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे या माशाची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणा तेथपर्यंत पोचणे कठीण आहे. तसेच समुद्राला उधाण स्थिती निर्माण झाल्यास सांगाडा पुन्हा समुद्रात वाहून जाण्याची शक्यताही वर्तविली आहे.

अमित खोत, मालवण

rapan bottom