Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवण नगरपरिषदच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला तरुणाकडून मारहाण

मालवण नगरपरिषदच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला तरुणाकडून मारहाण

स्वच्छता कंत्राटी कामगारांनी एकत्र येत छेडले काम बंद आंदोलन : कारवाईसाठी पोलीस ठाण्यात धाव : भाजपचा कर्मचाऱ्यांना पाठिंबा

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपपरिषद स्वच्छता विभागात काम करणाऱ्या एका कंत्राटी ट्रॅक्टर चालकाला वायरी येथे एका तरूणाने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी कंत्राटी कामगारांनी एकत्र येत आपल्या तीव्र भावना व्यक्त करतं तात्काळ काम बंद आंदोलन छेडले. मारहाण करणाऱ्या संबंधित तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कंत्राटी कामगारांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. कंत्राटी कामगारांना भाजपने पाठिंबा देत कर्मचाऱ्यांसोबत आपण ठामपणे असल्याचे स्पष्ट केले.

बुधवारी दुपारी वायरी भागात एका तरूणाने कचरा वाहतूक करणारा टॅक्टर आपल्या जागा परिसरात आल्याच्या कारणावरून टॅक्टरवरील चालकाला मारहाण केली. यामुळे कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत पालिका प्रशासनाला माहिती देत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास काम बंद करण्याचाही इशारा दिला.

आम्ही दिवसभर पावसाचीही तमा न बाळगता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत आहोत. गेली अनेक वर्षे ही सेवा आम्ही शहरवासीयांसाठी देत आहोत. असे असताना आम्हाला मारहाण होत असेल तर भविष्यात शहरात काम करणे कठीण आहे. आता तर नवीन ठेकेदाराकडून इतर जिल्हयातील कामगार आणण्यात आलेले आहेत. यामुळे त्यांनाही अशा प्रकारे त्रास होण्याची भीती आहे. आमच्यावरच हात उचलण्यात येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी कामगारांनी दिला. सदरची घटना घडल्यानंतर आम्ही पालिका प्रशासनाला कळवले मात्र अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. आम्ही पालिकेसाठी योगदान देत असल्याने त्यांनी आमच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा कर्मचाऱ्यां सोबत : सुदेश आचरेकर

नगरपरिषद कामगारांवर हात उचलण्याचा अधिकार कोणालाही नाही. नगरपालिकेच्यावतीने सध्या शहरात चांगल्या पद्धतीने स्वच्छतेचे काम सुरू आहे. असे असताना कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण होत असेल ते चुकीचे आहे. आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांचेही लक्ष वेधणार आहोत, असे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्पष्ट केले. भाजपच्यावतीने कंत्राटी कामगारांची पोलीस ठाणे याठिकाणी भेट घेत भाजपाकडून त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विजय केनवडेकर, भाजप शहर मंडल तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाजपा महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेजर, माजी बांधकाम सभापती गणेश कुशे, माजी नगरसेवक पंकज सादये तसेच तर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. सोबत असल्याचा विश्वास दिला.

पोलीस ठाण्यात ठाण

नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना मारहाण झाल्याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांना निर्देश देण्याचीही सूचना मुख्याधिकारी यांना करण्यात आली. मुख्याधिकारी यांनी तात्काळ आरोग्य निरीक्षकांना संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पत्र देण्याचे निर्देश दिले. त्या व्यक्तीवर आदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा पर्यत सर्व कंत्राटी कामगार पोलीस ठाणे येथे होते. यावेळी मारहाण करणारी व्यक्ती पोलीस ठाणे येथे आली व कर्मचाऱ्यांची माफी मागितली. असे सांगण्यात आले.

अमित खोत, मालवण

rapan bottom