आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
प्रतिनिधी | शानू वालावलकर : शिवसेना अजगणी शाखाप्रमुख पदी अतुल आनंद तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अतुल तांबे यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका अजगणी शाखाप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. शुभेच्छांसह ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !
▪️अमित खोत | मालवण

