आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली नियुक्ती
प्रतिनिधी | शानू वालावलकर : शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने व आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मालवण तालुक्यातील पोईप येथील युवा उद्योजक पंकज गणेश वर्दम यांची शिवसेना मालवण तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका लावला आहे. सोबतच सर्वाना पक्षात सामावून घेत असताना समतोल राखून अनेक नियुक्ती दिल्या आहेत. शिवसेना संघटना मजबूत केली जात आहे.
यावेळी छोटू ठाकूर, सुधीर साळसकर, बाबू परब, शहर संघटक राजू बिडये, प्रशांत परब, बाळा राऊत, शिवराम पालव, नारायण धुरी, भाऊ मोर्जे, संपर्क प्रमुख राजेश गावकर, विनोद भावे यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️ अमित खोत, मालवण

