Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यामुळे पर्यटकांची गैरसोय टळली !

माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यामुळे पर्यटकांची गैरसोय टळली !

चिवला बीच जवळ नारळाचे झाड पडून वीजपुरवठा झाले होते खंडित

राहुल जाधव । मालवण : शनिवार सकाळची झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मालवणमधील प्रसिद्ध चिवला बीच परिसरातील नागरिकांना आणि सध्या सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांना मोठा फटका बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका नारळाचे मोठे झाड वीज वाहिन्यांवर कोसळले. या घटनेत वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आणि परिणामी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

सध्या दिवाळी सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने मालवण शहरात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. चिवला बीच हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असल्याने येथे अनेक हॉटेल्स आणि स्थानिक व्यावसायिकांची दुकाने आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे व्यावसायिकांच्या धंद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पर्यटकांची गैरसोय झाल्यामुळे मालवणच्या पर्यटन व्यवसायालाही बाधा पोहोचण्याची भीती होती.

हा गंभीर प्रकार मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निदर्शनास आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिक आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू केले. झाड बाजूला करून तातडीने वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. त्यांच्या पुढाकाराने आणि अथक प्रयत्नांमुळे, काही वेळातच खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यश आले.

यतीन खोत यांच्या या त्वरित आणि प्रभावी कृतीमुळे स्थानिक व्यावसायिकांनी आणि पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे पर्यटनाच्या हंगामात होणारे मोठे नुकसान टळले.

याप्रसंगी मनोज शिरोडकर, रुपेश कांबळी, गणेश चिंदरकर, मनोज मयेकर, प्रदीप मयेकर, सर्वेश बागवे, राज कांदळकर यांसह अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांनीदेखील दुरुस्तीच्या कामात मोलाची मदत केली. यतीन खोत यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल व त्वरित कार्यवाहीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

rapan bottom