उपाध्यक्षपदी समीर शेख, मुस्ताक अथनीकर, आरिफ शेख ; सरचिटणीसपदी राजू डिंगणकर
मालवण : भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा मालवण शहर मंडळ अध्यक्षपदी साजिद बांगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी समीर शेख, मुस्ताक अथनीकर, आरिफ शेख तसेच सरचिटणीस पदी राजू डिंगणकर यांनाही नियुक्ती देण्यात आली.

भाजपा मालवण शहर मंडळ कार्यालय येथे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष निसार शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती देण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब, शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, भाई कासवकर, शकील शेख, अबिद बांगी, सहिद बांगी, सलीम खान, जाबीर खान, मस्तान अथनिकर, शाहनवाज शहा, सलमान शेख, आनंद मिठबावकर यांसह अन्य उपस्थित होते.




▪️ अमित खोत, मालवण

