शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावी शेतकर्यांची मागणी
गणेश चव्हाण | श्रावण : श्रावण परीसरात पाऊस थांबल्याने, भयभीत झालेल्या शेतकर्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. पावसाने व जंगली जणावरांनी पुर्णपणे शेताचे नुकसान केले आहे. पण जे मिळेल ते आपले असे म्हणुन शेतकरी कापणी करुन, भात पीक धान्य घरात आणत आहेत.
या वर्षाचा सर्वात मोठा ५ महिने, कालावधीचा पावसाळा थांबला आणि श्रावण परीसरात चिंताग्रस्त शेतकंर्यांनी भात कापणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. काही जाणकार असेही सांगत आहेत की पाऊस अजुन लागेल. त्यामुळे सकाळी सहा वा. पासुन दुपारचीही विश्रांती न घेता काळोख पडे पर्यंत शेतात राहुन जिवाची पर्वा न करता, भात कापणी, मळणी ही कामे शेतकरी करत आहेत. अती पावसामुळे बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निराश झालेले शेतकरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत.

