आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन पक्षप्रवेश
शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिनिधी | शानू वालावलकर : किर्लोस गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत, शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत, विभागिय अध्यक्ष अरविंद साटम, जिल्हा सरचिटणीस सुनील घाडीगांवकर, प्रवक्ते निलेश बाईत यांच्या उपस्थितीत किर्लोस चव्हाण वाडीतील असंख्य उबाठा गटातील कार्यकर्ते तसेच महिला वर्ग युवक युवतींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. कुडाळ मालवण कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या विकास कामांचा धडाका पाहुन त्यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन हा पक्ष प्रवेश करण्यात आला.
दळणवळण सेवा सुविधा पासून मागील दहा वर्षे हे लोक विकासकामां पासुन वंचित होते. चव्हाण वाडीमध्ये एक गठ्ठा मतदान असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त आश्वासनाचा पाऊस दिसायचा. शिवसेना जिल्हा सरचिटणीस सुनील घाडीगांवकर आणि त्यांचे बंधु सागर घाडीगांवकर, शाखा प्रमुख विनोद भावे गावप्रमुख यांच्या यशस्वी नियोजनात वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,
तालुका प्रमुख विनायक बाईत यांच्या मार्गदर्शनात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात सातत्याने पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मविर आनंद दिघे यांच्या आशीर्वादात मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना अपेक्षित असलेले काम आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत करत आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांना गुरु माणुन दत्ता सामंत नेहमीच समाजकारण करत आहेत. 1990 सालची शिवसेना पुन्हा एकदा कुडाळ मालवणच्या धर्तीवर उदयास आलेली पाहायला मिळत आहे. म्हणून अभ्यासू आमदार निलेश राणे साहेब जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या संघटना वाढीच्या कार्याचे कौतुक नेहमी करतात. होत असलेले पक्ष प्रवेश आगामी निवडणुकीतील विजयाची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी मतदार संघाचे पक्ष सचिव मंगेश यादव, श्रावण माजी सरपंच प्रशांत परब, मठबुद्रुक सरपंच बाळा वेंगुर्लेकर, आडवली सरपंच संजय आडवलकर, मठ शाखा प्रमुख कृष्णा बाईत, गोठणे शाखा प्रमुख प्रभुराम घाडीगांवकर, तुषार हाटले, किर्लोस शाखा प्रमुख विनोद भावे, किर्लोस गाव प्रमुख विलास भावे, उपशाखाप्रमुख शंकर भावे, एकनाथ चव्हाण, विजय चव्हाण, राजेंद्र चव्हाण, उदयसिंग चव्हाण, विजय चव्हाण, मंगेश चव्हाण, संदीप चव्हाण, संदेश चव्हाण, सचिन चव्हाण, समीर चव्हाण, अशोक चव्हाण, मारुती मुणगेकर, विनायक चव्हाण, संजय चव्हाण, अनंत चव्हाण, दत्ताराम चव्हाण, विलास भावे, प्रकाश चव्हाण, मधुकर चव्हाण, संजय भावे, शशिकांत भावे, प्रकाश राऊत, सूर्यकांत चव्हाण, रामचंद्र मुणगेकर, उमेश चव्हाण, अनिता चव्हाण, प्रभावती चव्हाण, पूजा चव्हाण, इंदू चव्हाण, सुष्मा चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.
▪️अमित खोत | मालवण

