Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मोठा संख्येने सहभागी होऊया...!

मोठा संख्येने सहभागी होऊया...!

भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्या वतीने आज रात्री 9 वा. भरड नाका येथे आयोजन


मालवण | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्यावतीने आज रविवार १९ ऑक्टोबर रोजी मालवण शहर भरड नाका येथे रात्री ९ वाजता 'भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक स्टेज मांडणी, एलईडी स्क्रीन अश्या भव्यदिव्यतेत बहुसंख्य स्पर्धकांच्या सहभागातून ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तरी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने संयोजक प्रशांत हिंदळेकर व सह संयोजक भाऊ सामंत यांनी केले आहे. 

जयजयकार श्रीकृष्णाचा, वध नरकासुराचा हे ब्रीद घेऊन या स्पर्धेचे यावर्षी प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा तीन गटात होत आहे. यात लहान गट - बालवाडी ते चौथी- अनुक्रमे २०००, १५००, १००० रुपये, उत्तेजनार्थ दोन- ५०० रुपये, खुला गट - पुरुष- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये, खुला गट - महिला- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धकांना श्रीकृष्ण-वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे. त्यासोबत राधा पात्र असले तरीही चालेल. तसे नसले तरीही स्पर्धक एकट्याने सादरीकरण करू शकतो. वेशभूषा, साहित्य आणि सादरीकरणाची तयारी स्पर्धकांनी स्वतःहून करायची आहे. स्पर्धेत अजून काही नियम असल्यास स्पर्धेच्या ठिकाणी ते सांगण्यात येतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

स्पर्धेत मालवण सह जिल्ह्यातून उत्स्फूर्त पणे नाव नोंदणी होत आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी अमित खोत- ९४०४४५७७८८ किंवा गणेश मेस्त्री ९४०४९१६८६९ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom