Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वाळू व्यावसायिक व डंपर व्यवसायिकांचे प्रश्न सोडवणार : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वाळू व्यावसायिक व डंपर व्यवसायिकांचे प्रश्न सोडवणार : दत्ता सामंत

मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिक व डंपर व्यवसायिकांनी घेतली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट

मालवण | प्रतिनिधी : वाळू व्यावसायिक तसेच डंपर व्यवसायिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित सोडवले जातील. अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वाळू व्यवसाय व डंपर व्यवसायिक यांच्या शिष्टमंडळाला दिली.

मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिक तसेच डंपर व्यवसाय यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली व व्यवसायातील अडचणी, रखडलेली वाळू टेंडर प्रक्रिया तसेच टेंडर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी प्रशासनाकडून न मिळणारे सहकार्य या सर्व बाबतीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे भूमिका मांडली. प्रशासना कडून मिळणारे असहकार्य व काही त्रासदायक गोष्टी बाबत तक्रारीही मांडण्यात आल्या. दत्ता सामंत यांनी व्यवसायिकांचे म्हणणे ऐकून घेत आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधला व व्यवसायिकांच्या असलेल्या समस्या त्यांच्याकडे व पोहोचवल्या आहेत. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी व्यावसायिकांचे जे काही प्रश्न असतील, प्रशासन स्तरावर ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे. आमदार निलेश राणे यांची मालवण दौऱ्यात भेट घेऊन याबाबत निवेदन दिले जाईल.अशी माहिती संजय वराडकर यांनी दिली. यावेळी शिवसेना मालवण शहर संघटक राजू बिडये यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संजय वराडकर, प्रणय कांबळी, मंदार कांदळकर, कौशल गवंडी, शुभम रेवंडकर, बंटी पेडणेकर, समीर मेथर, स्वप्नील सावंत, रोहन मयेकर, अमित कांबळी, प्रसाद परुळेकर, अमोल चव्हाण, आप्पा चव्हाण, शेखर वाक्कर, सागर भोगवेकर, शाम वाक्कर, बंटी चव्हाण, बाबू चव्हाण, संतोष सातार्डेकर, सुयश गावडे, राहुल गोलतकर, स्वप्नील देऊलकर, यश सक्रु, केदार कवटकर, ऋषी आसोलकर, सुशील शेडगे, सचिन मराठे, सिद्धेश परब, ओम कांबळी, सुयश गावकर, हेमंत चव्हाण, राजा सावंत, प्रशांत परब आदि वाळू व डंपर व्यावसायिक उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom