Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

लवकरच मुंबईत जलवाहतुकीत क्रांती

लवकरच मुंबईत जलवाहतुकीत क्रांती

स्वीडन दौऱ्यावर मंत्री नितेश राणे यांनी कॅन्डेला (Candela) कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची केली पाहणी

मुंबई : मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला (Candela) या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली.

या भेटीदरम्यान त्यांनी बाल्टिक समुद्रावर Candela कंपनीच्या C8 आणि P12 या अत्याधुनिक बोटींची सफर केली. या बोटी पाण्यावर glide होणाऱ्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून, वेगवान, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम आहेत. P12 ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. Candela कंपनीचे संस्थापक आणि CEO श्री. Gustav Hasselskog तसेच Chief Commercial Officer श्री. Nakul Virat यांनी मंत्री राणे यांना कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेचा आणि तांत्रिक नवकल्पनांचा सविस्तर आढावा दिला.



या भेटीदरम्यान महाराष्ट्रात Candela चे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली. मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीतील महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईत Candela ची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारी भागांतील जोडणी अधिक मजबूत होईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतुकीसह किनारी विकास आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, तसेच नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.

rapan bottom