Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

किल्ले सिंधुदुर्ग येथे 'एलईडी लाईट शो' व सुशोभीकरण होणार

किल्ले सिंधुदुर्ग येथे 'एलईडी लाईट शो' व सुशोभीकरण होणार

तारकर्ली येथे होणार पर्यटन उद्यान उभारणी ; 10 कोटी निधी मंजूर ; भाजपा मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तत्कालीन ऊर्जा मंत्री तसेच विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत मोंडकर यांनी मानले आभार

मालवण : सिंधुदुर्ग किल्ला येथे एलईडी लाईट च्या माध्यमातून किल्ल्याच्या सौंदर्यात अधिक झळाळी निर्माण होणार आहे. एलईडी लाईट शो माध्यमातून रात्रीच्या वेळी किल्ला उजळून निघणार आहे. परिसर सुशोभिकरण होणार आहे. तसेच तारकर्ली येथे पर्यटन उद्यान निर्मिती होणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांनी १० कोटी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती भाजपा मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.

यासाठी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तत्कालीन ऊर्जा मंत्री तसेच विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत मोंडकर यांनी आभार मानले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. मोंडकर बोलत होते. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा सरचिटणीस विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, तालुका उपाध्यक्ष संमेश परब, महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर, भाई कासवकर, ललीत चव्हाण, पंकज सादये, बबलू राऊत, विक्रांत नाईक, जिल्हा चिटणीस सेजल परब, शर्वरी पाटकर, पूजा करलकर, ममता वराडकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, सेजल परब, अमिता न्हिवेकर, चित्रा हरमलकर, राणी पराडकर, साक्षी आहिर, मयुरी दाभोलकर, दिपाली वायंगणकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोंडकर म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ला हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे. किल्ले प्रेरणोत्सव समिती, टी. टी. डी.एस, पर्यटन व्यावसायिक महासंघ अशा अनेक संस्थांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा किल्ल्यावरील सोई सुविधा साठी शासन प्रशासन स्तरावर चालू असतो. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत जी अनेक वर्षांची मागणी होती की, सिंधुदुर्ग किल्ला येथे एलईडी लाईट शो सुरु करण्यात यावा. तसेच सिंधुदुर्ग मालवण किल्ला एलईडी शो बसवून त्याचे सुशोभिकरण करणे व विद्युत पुरवठा करणे, या कामाची सुरुवात या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री असताना या निधीच्या पूर्ततेच्या दिशेने सुरुवात झाली होती. त्याला मूर्त स्वरूप राज्य शासनाच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या वतीने झाले. सिंधुदुर्ग किल्ला एलईडी आणि सुशोभिकरणासाठी ७ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. पर्यटन अंतर्गत प्राप्त झालेला सगळ्यात मोठा निधी आहे, असेही श्री. मोंडकर म्हणाले आहेत.

दांडी दांडेश्वर मंदिरापासून पद्मगड येथून वीजेची लाईन गेली होती तर ती लाईन खाली आली होती याबाबत भाजपा तालुका उपाध्यक्ष संमेश परब व अन्य मच्छीमारांची मागणी होती की त्याठिकाणी वीजखांब जास्त उंचीचे बसवावेत. तारा वर जाव्यात तेही काम प्रत्यक्ष सुरु झालेले आहे. जेटी आहे त्याठिकाणी दोन्ही बाजूने एलईडी लाईट लावण्याचे काम आता सुरु झालेले आहे. सिंधुदुर्ग किल्ला येथे जो एलईडी लाईट शो चा प्रकल्प सुरु होण्याच्या दृष्टीकोणातून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.

भाजपच्यावतीने एक काम सुचविले होते. तारकर्ली येथील शासकीय जागेमध्ये पर्यटनपूरक उद्यान विकसीत करणे या उद्यानाच्या प्रकियेमध्ये सरकारी जागा आहे त्या जागेची पाहणी झाली आहे. आणि त्या जागेसाठी शासनाने ३ कोटी या उद्यानासाठी मंजूर केलेले आहेत. आणि या निधीतील काही निधी पहिल्या टप्प्यात वर्ग झाला आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करीत असताना जनतेसाठी रस्ते वीज पाणी या मुलभूत सुविधा पाहिजेच परंतु रोजगारामध्ये ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करुन रोजगारामध्ये वाढ करायची असेल तर असलेले आपले पर्यटनपूरक विषय आहेत त्यावर काम झाले पाहिजे आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातून या दोन्ही प्रकल्पांचा आपण विचार करतो त्यासाठी १० कोटी १२ लाख रुपयांचा निधी हा प्राप्त होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष पद तसेच नगरसेवक पदासाठी पडलेल्या आरक्षणाचा विचार करता जाहीर झालेले आरक्षण भारतीय जनता पार्टीसाठी नगराध्यक्ष, नगरसेवक शतप्रतिशद भाजपासाठी सकारात्मक आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून जशापद्धतीने आदेश येतील तसे काम आम्ही करणार अहोत. असे बाबा मोंडकर यांनी सांगितले.

rapan bottom