Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहिण योजनांची रक्कम दिवाळी पूर्वी जमा करा !

संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहिण योजनांची रक्कम दिवाळी पूर्वी जमा करा !

राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

मालवण : संजय गांधी निराधार योजना,लाडकी बहिण योजना यांची रक्कम लाभार्थीच्या खात्यावर दिवाळी पूर्वी जमा करा ; अन्यथा वर्गणी काढून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्र्यांना भाऊबीज पाठवणार असल्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसच्या महिलां कार्यकर्त्या रुपाली जेम्स फर्नांडिस यांनी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांना निवेदना द्वारे दिला.

मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी व महिलां कार्यकर्त्यांनी आज मालवण तहसील कार्यालयास भेट दिली.यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुका अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, पराग माणगावकर,महिलां कार्यकर्त्यां अँड.अमृता अरविंद मोंडकर, रूपाली जेम्स फर्नांडिस, शुभदा गणेश पाडगावकर, प्राची पराग माणगावकर,सारा फर्नांडिस, आदि उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्य सरकार वतीने संजय गांधी निराधार योजना,इतर शासकीय योजना महिलांना दिल्या जातात तसेच विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान राज्यातील महिलां साठी लाडकी बहिण योजना देण्याची घोषणा करून यां योजनेद्वारे बहिणींना रुपये १५००/- रक्कम देण्यात आली. मात्र निवडणूका झाल्या आणि सत्तेत आल्यावर भाजपा-शिंदे सेना-राष्ट्रवादी अजित पवार गटना या लाडक्या बहिणीचा विसर पडला आहे.योजना अंतर्गत महिलांना मिळणारा लाभ यात त्रुटी निर्माण करून शासनाने काही प्रमाणात यावर निर्बंध आणले यामुळे अनेक गोरगरीब महिलांना (लाडक्या बहिणींना ) या योजनेचा लाभ मिळणे बंद झाला आहे.या योजने अंतर्गत लाभार्ती महिलांना मिळणारी रक्कम हि तुटपुंजी असली तरी गावा खेड्यातील महिलांना हि रक्कम तात्पुरती गरजेची होती.मात्र ही रक्कम गेले वर्षभर न मिळाल्याने तसेच ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरेशा नसल्याने या योजनेची माहिती महिलांना योग्य वेळेत मिळत नाही. त्यामुळे या महिलांना रक्कमेची चौकशी करण्याकरिता बँका तसेच तहसील कार्यालयामध्ये वारंवार यावे लागते. यात वेळ पैसा वाया जातो.
त्यामुळे ही रक्कम याच आठवड्यात दिवाळी पूर्वी महिलांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे.अन्यथा वर्गणी काढून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्र्यांना भाऊबीज पाठवणार असे लेखी पत्र तहसीलदार मालवण यांना देत राष्ट्रीय काँग्रेसच्या महिलां कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.

rapan bottom