मालवण : ग्रामपंचायत वायरी भूतनाथ यांच्या वतीने येथील शेतकऱ्यांची शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी नोंदणी करण्यात आली. तर आरोग्य विभागाच्या वतीने आभा कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड काढण्यात आले.
मालवण तालुका कृषि कार्यालय व ग्रामपंचायत वायरी भूतनाथ यांच्या वतीने उपसरपंच प्राची पराग माणगांवकर यांच्या सहकार्याने माणगांवकर काजू फॅक्टरी वायरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी नोंदणीचा भूतनाथ वाडी, तेलीवाडी, उभाटकर वाडी, येथील शेतकरी बांधवाणी लाभ घेत शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी नोंदणी केली. तसेच महाविस्तार CAT मोबाइल अँप वापरा बाबत मार्गदशन घेतले.


यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने आभा कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड काढण्यात आली. यासाठी बहुसंखीय ग्रामस्थ उपस्थित होते. कृषि विभागाच्या वतीने कृषि सहाय्यक किशोर कदम, डाटा ऑपरेटर कु. मेस्त्री, तर आरोग्य विभागाच्या वतीने सौ. एस. सी. दुखडे, हर्षद तोंडवळकर, श्रीमती तळवडेकर, सौ. आकांक्षा गोसावी, देवानंद लुडबे, श्री. पराग माणगांवकर, तसेच लाभार्थी साईनाथ माडये, मिलिंद मयेकर, श्रीमती. मालवणकर, दीपा केळूसकर, शिला लुडबे, शशिकांत पाटकर, दत्ताराम पाटकर, उर्मिला माणगांवकर, श्री. आचरेकर, सिया मांजरेकर, आदि उपस्थित होते.

