हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्या वतीने १९ ऑक्टोबर रोजी आयोजन
मालवणसह जिल्हास्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवणच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी मालवण शहर भरड नाका येथे रात्री ९ वाजता 'भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संयोजक प्रशांत हिंदळेकर व सह संयोजक भाऊ सामंत यांनी दिली.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीची बैठक भरड येथील दत्त मंदिर येथे पार पडली या बैठकीस समितीचे सहसंयोजक भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, अमित खोत, अनिकेत फाटक, गणेश मेस्त्री, श्रीराज बांदेकर, अरविंद मयेकर, भूषण साटम, ग्रंथापाल संजय शिंदे, समीर म्हाडगुत यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. जयजयकार श्रीकृष्णाचा, वध नरकासुराचा हे ब्रीद घेऊन या स्पर्धेचे यावर्षी प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. यात लहान गट - बालवाडी ते चौथी- अनुक्रमे २०००, १५००, १००० रुपये, उत्तेजनार्थ दोन- ५०० रुपये, खुला गट - पुरुष- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये, खुला गट - महिला- अनुक्रमे- ३०००, २०००, १५०० रुपये, उत्तेजनार्थ दोन- १००० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.
स्पर्धकांना श्रीकृष्ण-वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे. त्यासोबत राधा पात्र असले तरीही चालेल. तसे नसले तरीही स्पर्धक एकट्याने सादरीकरण करू शकतो. प्रत्येक स्पर्धकास जास्तीत जास्त ३ मिनिटांपर्यंत सादरीकरणाचा कालावधी दिला जाईल. राधाकृष्ण, कृष्ण, सुदामा, गोवर्धन पर्वत, कालिया मर्दन, श्रीकृष्ण जन्म, कंस वध यापैकी एक तसेच महाभारतातील कोणताही श्रीकृष्ण लीला प्रसंग निवडता येईल. वेशभूषा, साहित्य आणि सादरीकरणाची तयारी स्पर्धकांनी स्वतःहून करायची आहे. स्पर्धेत अजून काही नियम असल्यास स्पर्धेच्या ठिकाणी ते सांगण्यात येतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी अमित खोत- ९४०४४५७७८८ किंवा गणेश मेस्त्री ९४०४९१६८६९ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मालवणसह जिल्हास्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद
'भगवान श्रीकृष्ण वेशभूषा' स्पर्धेला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळतं आहे. खऱ्या अर्थाने आवश्यक अश्या चांगल्या स्पर्धेचे आपण आयोजन केले आहे. अश्या प्रतिक्रिया अनेकांकडून येत आहेत. सोबतच मालवण सह जिल्ह्यातून स्पर्धेतील नाव नोंदणीसाठी सहभाग दर्शवला आहे. शनिवारी रात्री पर्यत नाव नोंदणी केली जाणार आहे.

