शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी नगरपरिषद व वीज वितरण विभागाचे वेधले लक्ष
मालवण | प्रतिनिधी : आगामी दिवाळी उत्सव तसेच २२ ऑक्टोबर रोजी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण पालखी सोहळा निमित्ताने मालवण शहर परिसरातील पालखी सोहळा होत आहे. तरी पालखी मार्गांवर स्वच्छता व लाईट व्यवस्था योग्य पद्धतीने करावी. याबाबत शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी नगरपरिषद व वीज वितरण विभागाचे लक्ष वेधले आहे.
नागरिकांना तसेच भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी दिपक पाटकर यांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

