काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली महत्वपूर्ण जबाबदारी
मंगेश नलावडे | मालवण : आगामी जिल्हा परिषद, पंचयत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री अरविंद मोडकर यांची मालवण-देवगड निवडणूक प्रमुख पदी निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी या निवडीचे पत्र श्री मोडकर यांना दिले.
येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत देवगड- मालवण तालुक्याचे निवडणूक प्रमुख म्हणून श्री.मोडकर हे जबाबदारी सांभाळणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारांचे अर्ज मागवणे, उमेदवार निवडीची पक्रिया राबवणे, आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी संदर्भात चर्चा करणे हे सर्व अधिकार श्री मोडकर यांना कोंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. ही सर्व कामे त्या-त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तसेच जिल्हाध्यक्षांशी चर्चा करण. आपण दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल याची पक्षाला खात्री आहे. असे नियुक्ती पत्र सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिले. मालवण-देवगड निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

