Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

जिल्ह्यातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

जिल्ह्यातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत 'महाप्रीत' सोबत महत्त्वपूर्ण बैठक

मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी छोटे उद्योग, कोल्ड स्टोरेजसाठीही सौर यंत्रणा होणार कार्यान्वित

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे, तसेच मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोरेज यंत्रणा कार्यान्वित करणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या 'महाप्रीत'या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांना महत्त्वाच्या सूचनाही श्री.राणे यांनी केल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) या संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री नितेश राणे यांनी चर्चा केली. सौर ऊर्जेवरील या यंत्रणा कार्यान्वित करणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांची कामे ‘महाप्रीत’च्या माध्यमातून जलद आणि दर्जेदार रित्या पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

rapan bottom