Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

कणकवलीत वारकरी संप्रदायाचा ९ नोव्हेंबर भव्य दिंडी सोहळा

कणकवलीत वारकरी संप्रदायाचा ९ नोव्हेंबर भव्य दिंडी सोहळा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीवर्ष आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३५० व्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन

मृदुंग वादक, टाळकरी, विणेकरी, तुळस व कलशासह हजारो वारकऱ्यांचा असणार सहभाग

कणकवली ; सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्या वतीने रविवार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी, कणकवली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीवर्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त कणकवली शहरात वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य "वारकरी दिंडी" चे आयोजन करण्यात आले आहे. एसटी वर्कशॉप येथील गणेश मंदिर येथून ही दिंडी परमपूज्य भालचंद्र महाराज मठापर्यंत जाणार आहे. या वारकरी दिंडीत ३५० मृदुंग वादक, तेवढेच टाळकरी,विणेकरी, तुळस, कलश घेऊन या वारीत सहभागी होणार आहे. न भूतो न भविष्यती अशी ही वारकरी दिंडी कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग यांची नुकतीच कणकवली येथे बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज,सचिव गणपत घाडीगावकर, कार्याध्यक्ष संतोष राऊळ, खजिनदार मधुकर प्रभूगावकर, उपाध्यक्ष राजेंद्र राणे, चंद्रकांत परब, विजय सुतार, प्रभाकर सावंत, विनायक मेस्त्री, तुषार मेस्त्री,निवृत्ती मेस्त्री, लक्ष्मण कडव, सर्वोत्तम साटम,दीपक मडवी, सत्यवान परब,रामचंद्र कदम, शामसुंदर राणे, गणपत पांचाळ, राजन साळुंखे, शंतनू गावकर, अच्युत घाडीगावकर संभाजी मेस्त्री, नाना गावडे, जनार्दन परब, निलेश कदम, सुरज पवार, गुरुनाथ चव्हाण, प्रभाकर राणे,चंद्रकांत पाटील, यांच्यासह सर्व तालुक्यांचे अध्यक्ष आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत वारकरी दिंडीचे नियोजन करताना या दिंडीत जे मृदुंगमणी व विणेकरी टाळकरी तुळस, कळस घेऊन सहभागी होणार आहेत त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या ठिकाणी दुपारी पंक्ती भोजनाचे सुद्धा व्यवस्था करण्यात आलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम वारकऱ्यांनी आणि जनतेने या वारकरी दिंडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom