वर्षभरात सभासद हिताचे निर्णय- अध्यक्ष चंद्रसेन पाताडे
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सभासदांना शेअर्स रकमेवर तब्बल साडेपाच टक्के दराने दिवाळी भेट पावती देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी दिली आहे.
सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी आमचे संचालक मंडळ कटिबद्ध असून यापूर्वी गणेश चतुर्थी सणाला संस्थेने सर्वाधिक पंधरा टक्के दराने डिव्हिडंड वाटप केला होता.आता दिवाळी सणानिमित्त सभासदांना दिवाळी भेट पावती हा लाभ दिवाळी पूर्वीच देण्यात येणार आहे.गेल्या वर्षी संस्थेने सभासदांना सदर लाभ तीन टक्के दराने दिला होता. आता तो अडीच टक्क्यांनी वाढून संचालक मंडळाने साडेपाच टक्के दराने दिला आहे.
सदर सभासद हितकारी निर्णय राबविण्यासाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले असल्याची माहिती अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी दिली आहे.
▪️अमित खोत | मालवण

