Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

गांजा बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीसांनी अटक केलेल्या संशयितास सशर्त जामीन मंजूर

गांजा बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीसांनी अटक केलेल्या संशयितास सशर्त जामीन मंजूर

आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले

मालवण : मोरेडोंगरी- सावंतवाही येथील घराच्या अंगणात अवैध गांजा बाळगल्याप्रकरणी अटक संशयीत जावेद पिरसाब शेख वय 38 वर्ष राह. मोरेडोंगरी सावंतवाडी यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब सावंतवाडी यांनी रक्कम रु. 25,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयीतातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.

सावंतवाही पोलिसांनी दि. 12/10/2025 रोजी मोरेडोंगरी- सावंतवाही येथे केलेल्या छाप्याच्या कारवाईत जावेद पिरसाब शेख या संशयीतास त्याच्या राहत्या घराच्या अंगणातून अवैध गांजासहीत अटक करून ताब्यात घेतले होते. त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8(C), 20(b) II(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रमाणे प्राथमिक तपासकाम करून संशयितास मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सावंतवाडी यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. जप्त गांजासदृष्य पदार्थ कोठून आणला याच्या तपासासाठी अधिक तपासाकरिता पोलिसानी संशयीताची 5 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली. संशयितांतर्फे केलेल्या युक्तीवादानुसार व आवश्यक रिकव्हरी व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून मे. न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

त्यानंतर संशयीतातर्फे जामीनअर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयिताची रक्कम रु. 25,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.

rapan bottom