Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धडक

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धडक

मालवण पोलीस निरीक्षकां समोर वाचला तक्रारींचा पाढा

'त्या' पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाचा दिला इशारा

मालवण : मालवण पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यां बाबत काही तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे यांनाही या पोलीस कर्मचाऱ्यांचा कारभाराचा अनुभव आला. याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना समजताच त्यांनी पदाधिकाऱ्यांसह मालवण पोलीस ठाण्यात धडक दिली. त्या तीन पोलीस कर्मचारी यांची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मोर्चा काढला जाईल. असा इशारा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना दिला.

याबाबत माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, शिवसेना मालवण तालुका प्रमुख राजा गावडे यांच्या चौके येथील फार्म हाऊस ठिकाणी मालवण पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे कंपाऊंडमध्ये प्रवेश केला. परंतु त्याठिकाणी असलेल्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. त्यानंतर पोलीस पाठच्या पाठी फिरले. पोलीस प्रशासनास याबाबत विचारणा केली असता योग्य ते उत्तर मिळाले नाही. नक्की ते का आले होते याची पुर्णपणे खात्री पटलेली नाही. याबाबत शिवसेना बैठकीत याबाबत चर्चा झाली असता त्या तीन पोलीस कर्मचारी घागरे, पेडणेकर, पवार यांच्या बाबत काही अन्य तक्रारी पुढे आल्या. त्याचप्रमाणे मालवण शहरात देखील काही पोलीस कर्मचारी यांच्या विरोधात तक्रारी असल्याची माहिती समोर आली. मालवणच्या जनतेला जो त्रास होतीय जी लुटमार होतेय तसेच बकायदेशीर धंद्यांसाठी देखील यांचे समर्थन असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्वांची चौकशी होऊन योग्य ती कारवाई झाली पाहिजे अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पाच हजार जनसमुदाय घेऊन मोर्चा काढला जाईल. असा संतप्त इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण पोलीस निरीक्षक यांना दिला आहे.

काही ठिकाणी अवैध दारू व अन्य धंदे सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. याचीही चौकशी व्हावी. तरुणांई उध्वस्त करणारे, घरे उध्वस्त करणारे अवैध धंदे कोण करतं असतील आणि त्याला कोणाचा पाठिंबा मिळतं असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारवाई झालीच पाहिजे. अशी भुमिका घेण्यात आली. तसेच या सर्व प्रकरणात मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे, कॉल डिटेल तपासण्यात यावेत याबाबत मागणीही केली जाणार आहे. लवकरच या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईक विनायक राणे, उप तालूका प्रमुख विजय चव्हाण, उप तालुका प्रमुख बाळू नाटेकर, अभी गावडे, अनंत धडाम, देवेंद्र नाईक, देवेंद्र नाईक, छोटू ठाकूर, पिंट्या गांवकर, शिवाजी परब, मनोज हडकर, मंदार लुडबे, भाऊ चव्हाण, प्रशांत परब यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

rapan bottom