Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

मुंबई : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली.

या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी वर्ग अशा प्रकारचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होते याकरिता आमदार निलेश राणे यांनी पूर्णवेळ विभाग नियंत्रक नेमावा अशी आग्रहाची भूमिका मांडल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ नियुक्ती करावी असे माननीय परिवहन मंत्री यांनी निर्देश दिले त्याचबरोबर सिंधुदुर्गनगरी बसस्थानकासाठी सुमारे 50 गुंठे क्षेत्रावर सुसज्ज व आधुनिक सुविधा असलेले बसस्थानक उभारण्याचे निर्देश देखील मंत्री महोदयांनी यावेळी दिले.

त्याचबरोबर कुडाळ बसस्थानकातील आसन व्यवस्था वाढविणे,प्रवाशांसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देणे ,नव्याने दिलेल्या सीएनजी गाड्यांसाठी लागणाऱ्या सीएनजी पंपाची जागा कुडाळ डेपोमध्ये निश्चित करण्यात यावी असेही मंत्री महोदयांनी सांगितले
याशिवाय आमदार श्री राणे त्यांनी कुडाळ आणि मालवण डेपोंना प्रत्येकी पाच नव्या गाड्या तातडीने देण्याचे आदेश देण्यात यावेत,कसाल बसस्थानकाची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने ती नव्याने उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावे अशी ही मागणी त्यांनी केली यानंतर मंत्री महोदयांनी स्पष्ट शब्दात सदरहू प्रलंबित कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील मंत्री महोदयांनी दिले.
या बैठकीस परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांच्यासमवेत विभाग नियंत्रक प्रकाश बोरसे, विभागीय अधीक्षक अभियंता अक्षय केकरे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख तसेच विभागीय कर्मचारी अमित कलकुटकी उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom