कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेत करणार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत जय गणेश इग्लिश मिडिअम स्कूल, मालवणच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवले. या संघाची कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच हा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल ने १४ वर्ष मुली गटात प्रथम क्रमांक पटकावला. यात सोनाक्षी शेलटकर ,हिमांगी मलिक, रिया मेस्त, रिया शेलटकर, यशिका चव्हाण, जीविका तोडणकर, सुजाता कदम, शमिका पाटील,प्रतिभा परुळेकर, निधी फाटक, गौतमी गावकर ,काव्या शेलटकर. या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
हा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून या संघाची कोल्हापूर विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक निशाकांत पराडकर, पंकज राणे, कबड्डी प्रशिक्षक नितीन हडकर, दीपक जाधव या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विजेत्या संघाचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वेंगुर्लेकर, सर्व शिक्षक,कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

