आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्ती केली जाहीर
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ तालुक्यातील दोन महिला पदाधिकारी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. ममता दत्तगुरु राऊळ यांची कुडाळ महिला तालुका कार्यकारणी सदस्यपदी तर सोनाक्षी सुधीर गावडे यांची पिंगुळी शिवसेना महिला गावप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख दिपक पाटकर, जिप माजी सभापती संतोष साठविलकर, मालवण पंचायत समिती माजी सभापती सुनील घाडीगावकर, रामगड सरपंच शुभम मठकर, देवली सरपंच शाम वाक्कर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


▪️ अमित खोत, मालवण

