Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

चौके व्यापारी संघटना अध्यक्षपदी नितीन गावडे यांची निवड

चौके व्यापारी संघटना अध्यक्षपदी नितीन गावडे यांची निवड

उपाध्यक्षपदी रमेश सावंत , भूषण गावडे तर सचिवपदी पुरुषोत्तम आचरेकर यांची निवड

चौके : आदर्श व्यापारी संघटना चौके या संघटनेची वार्षिक सभा श्री देवी भराडी मंदिर चौके येथे पार पडली. या सभेत व्यापारी संघाचे कर्तुत्ववान अध्यक्ष नंदकुमार राणे यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या या रिक्तपदी गेली अनेक वर्षे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले श्री नितीन गावडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री भूषण गावडे व रमेश उर्फ बाबू सावंत व सचिव पदी पुरुषोत्तम उर्फ भाई आचरेकर यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली.

आदर्श व्यापारी संघ चौके या संघटनेची वार्षिक सभा संघाचे सचिव रमाकांत उर्फ नाना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौके ग्रामदेवता श्रीदेवी भराडी मंदिर येथे नुकतीच पार पडली. या सभेत पुढील दोन वर्ष कालावधीसाठी नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह कार्यकारणी निवड, वार्षिक जमा खर्च, तसेच पुढील नियोजित कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. या सभेस मार्गदर्शक उद्योजक राजन गावडे, संतोष गावडे,बिजेंद्र गावडे, सचिन आंबेरकर यांच्यासह बाजारपेठेतील जेष्ठ हॉटेल व्यवसायिक बबन आंबेरकर,भाई गावडे,सुनील आंबेरकर,बाबाजी मेस्त्री,प्रकाश गावडे,गोविंद गावडे,दादा गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

▪️ अमित खोत | मालवण

rapan bottom