सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड
मंगेश नलावडे | मालवण : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत मालवण रेकोबा हायस्कूलचा खो खो संघ विजेता ठरला. सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल कौतुक केले जात आहे.
क्रीडा व युवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदूर्ग आयोजित जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग नगरी येथे नुकतीच १४ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय खो खो संपन्न झाल्या. यात मालवण रेकोबा हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी नेत्र दीपक यश मिळविले. यात कार्तिक रावले, हर्षल मोरजकर, मयूर चव्हाण, गौरंग मालंडकर, लक्ष्मण झोरे, जीत लुडबे, केदार मसुरकर, चैतन्य आळवे, तन्मय मालंडकर, विराट मेस्त, कौस्तुभ नाईक हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेसाठी त्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्रीनाथ फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे चांगली कामगिरी केल्याबद्दल संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी तसच मुख्याध्यापक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.
▪️अमित खोत | मालवण

