Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

शेकडो कोटी विकासनिधीच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित विकास साध्य करणार : आ. निलेश राणे

शेकडो कोटी विकासनिधीच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित विकास साध्य करणार : आ. निलेश राणे

पोईप जिप विभागातील शेकडो उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

उबाठा युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, पोईप माजी सरपंच शिवरामपंत पालव यांनी हाती घेतला भगवा

मालवण | प्रतिनिधी : माझी दुसरी इनिंग राणे साहेबांच्या मतदारसंघातून झाली हे देवाचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे. शिंदे साहेबांना अपेक्षित शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना राणे साहेबांचा मतदार संघ आणि राणे साहेबांची माणसे जपणे हे माझे कर्तव्य आहे. दहा वर्षे मागे पडलेल्या या मतदार संघाचा आणि जनतेला अपेक्षित विकास हेच माझे लक्ष आहे. आमदार म्हणून सुमारे 200 कोटी पेक्षा जास्त विकासनिधी आगामी काळात या मतदारसंघात आणणार. त्या सोबत जिल्हा नियोजन, राज्य सरकार, केंद्र सरकार या माध्यमातून मोठा निधी येतोय. यापुढे येत राहील. शेकडो कोटी विकासनिधीच्या माध्यमातून गावागावात जनतेच्या मागणीनुसार विकास होईल. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन स्पष्ट केले.

उबाठातुन अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होत आहेत. दहा महिन्यात दहा ते बारा हजार एकूण संख्येने प्रवेश झाले. यात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त काम जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आहे. त्यांचा शब्द कधी पडू देणार नाही. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या कामाचेही भरभरून कौतुक केले.

पोईप धरण येथे पाणी साठवण होत नाही. ओसाड 75 एकर जामीन मध्ये एक उद्योग वसाहत उद्योग मंत्री यांच्या माध्यमातून निर्माण करणार. कारखाना रोजगार निर्मिती करणार. असा शब्द आमदार निलेश राणे यांनी पोईप येथे बोलताना ग्रामस्थांना दिला.

उबाठा युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, माजी सरपंच शिवरामपंत पालव यांसह पोईप जिप मतदारसंघातील शेकडो उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, दिपक नारकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, राजन माणगांवकर, सरपंच श्रीधर नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि गावडे, स्वप्नील गावडे, अनिकेत तेंडोलकर, सागर वालावलकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, उपतालुका प्रमुख विजय चव्हाण, अरुण तोडणकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, भाऊ चव्हाण, छोटू ठाकूर, पिंट्या गांवकर, विभागप्रमुख कमलेश प्रभू, राजू बिडये, मंदार लुडबे, प्रदीप माने, पपू वराडकर, बाळा पालव, स्वरूप वाळके, राहुल बागवे यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी जिप सभापती अनिल कांदळकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनिल कांदळकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेबांनी अनेक पदे दिली मानसन्मान दिला. तरीही राणे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता हेच आमचे मोठे पद आहे. आज आमदार निलेश राणे हे राणे साहेबांप्रमाणे काम करतं आहेत. व्हिजन असणारे एक अभ्यासू नेतृत्व मालवण कुडाळ ला लाभले. असे सांगत माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामाचे कौतुक केले.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेना जोमाने वाढत आहे : दत्ता सामंत

जे येतील त्या सर्वांचे पक्षात स्वागत. सगळ्यांना एकत्र घेऊन जोमाने एकसंघ शिवसेना संघटना वाढत आहे. राणे साहेबांनी 1990 मध्ये जशी शिवसेना वाढवली तशी शिवसेना आमदार निलेश राणे वाढवत आहेत. विकास गतिमान आहे. ग्रामस्थ सुचवतील ती कामे मंजूर करून गांव विकासाची जबाबदारी आमची. पक्ष प्रवेशांचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच आहे. त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेना वाढत आहे. एक कुटुंब म्हणून ते सर्वाना सोबत घेऊन पुढे जात आहेत. असे सांगत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या संघटना वाढ व विकास
कार्याचे कौतुक केले. सोबत माजी जिप सभापती अनिल कांदळकर, शिवसेना शाखा प्रमुख नारायण राणे यांच्या सेवाभावी कामाचेही दत्ता सामंत यांनी विशेष कौतुक केले. तसेच पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले.

प्रत्येकाला अभिमान वाटावे असे आमदार निलेश राणे यांचे कार्य : माजी आमदार राजन तेली

राणे साहेबांसोबत 1990 ला काम केलेल्या त्या कामाची आठवण येते असे काम आमदार निलेश राणे करत आहेत. विधानसभा सभागृहात मोठे वजन असलेले आणि जनतेचे प्रश्न मांडून मोठा निधी आणणारे अभिमान वाटावा असे नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे. असे सांगत माजी आमदार राजन तेली यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामांचे विशेष कौतुक केले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचेच आहे. त्याच धर्तीवर आमदार निलेश राणे जनतेला अपेक्षित असे धडाडीचे काम करतं आहेत. असे राजन तेली यांनी स्पष्ट केले.

भगवा गावागावात आणि घराघरात पोहचला पाहिजे

आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणूक महत्वाच्या आहेत. भगवा गावात आणि घराघरात पोहचला पाहिजे. सर्वत्र भगवा फडकला पाहिजे. ही निवडणुक तुमच्या पुढील 25 वर्षे अस्तित्वाची आहे. त्या दृष्टीने तयारी करा. विकास कामांची जबाबदारी आमची. तुम्ही जनतेला देणार तो विकासकामांचा शब्द पुर्ण करण्याची जबाबदारी आमची. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

विकास म्हणजेच आमदार निलेश राणे ; पंकज वर्दम

दहा महिन्यात विकासाचा सपाटा आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुरु आहे. याचं विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. ग्रामस्थानी सुचवलेली अनेक विकासकामे पुर्ण होत आहेत. येथील कोसळलेला पूल लगेच उभराला. तात्काळ विकास म्हणजे आमदार निलेश राणे. तुमच्या सारखे अभ्यासू आमदार यांचे मार्गदर्शन हेच आमचे भाग्य. विधानसभा सभागृह गाजवणारे आमदार आम्हाला लाभले आता गतिमान विकस कामे आमच्याही विभागात होणार. धरण परिसरात रोजगार निर्माण होईल. असे पंकज वर्दम यांनी सांगितले.

उबाठा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांचा शिवसेनेत प्रवेश

पंकज वर्दम युवासेना उपजिल्हा प्रमुख तथा ग्राम. प. सदस्य, संस्था संचालक, परशुराम नाईक, शिवरामपंत पालव माजी सरपंच, नाना पालव (वैद्य), संतोष हिवाळेकर (संस्था संचालक), सुनिल भाटकर, दाजी येरम, श्रीकांत येरम, प्रकाश येरम, भाई येरम, सचिन पालव, शुभम भाटकर, रुपेश वर्दम, संदिप पालव, सुरभी पालव, बाबू पाटकर, समिर पालव, नागेश कोकरे, बाजी माने, सुशिल पालव, दिपक पालव, दिपक नाईक, गणेश गोसावी, शुभम हिवाळेकर, नवनाथ दळवी, महेंद्र दळवी, भूषण पाटकर, छोटू पालव, राजू माने, हितेश जाधव, पांडुरंग पालव, गणेश माने, रामचंद्र माने, संजना पालव, सागर भाटकर, दिपीका भाटकर, दिनकर भाटकर, नाना तावडे, महेश नाईक, सुनिल नाईक, संचिता पालव, रोहित वडर, शंकर वडर, सुरेश वडर, तानाजी वडर.

पोईप येरमवाडी, म्हसकरवाडी, ग्रामस्थ

संचिता पालव, सविता येरम, सुजाता येरम, वैशाली वडर, कल्पना वडर, मानसी नाईक, नम्रता धुरी, नारायण पालव, विजयश्री चव्हाण, पूर्वा चव्हाण, साक्षी चव्हाण ,प्रतिभा चव्हाण, गीतांजली चव्हाण,क्रांती चव्हाण, सुमन चव्हाण, सुचित्रा चव्हाण, सुषमा नांदोस्कर, सानिका चव्हाण, वंदना केळकर, आरती चव्हाण, अश्विनी चव्हाण, वसंत चव्हाण,संतोष नांदोस्कर, सत्यवान चव्हाण,कमलेश चव्हाण, दर्शन चव्हाण, यशवंत चव्हाण, पवन चव्हाण, नितीन चव्हाण, रुपेश चव्हाण, अजिंक्य चव्हाण, सुभाष चव्हाण, प्रदीप चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, बाबली नांदोस्कर, रमेश चव्हाण, अमित चव्हाण , किशोर चव्हाण, प्रकाश नांदोसकर, दाजी नांदोसकर,वीरेश माळकर, करण नांदोसकर, हेदुळ गाव उबाठा गट संतोष हेदळकर, लक्ष्मण पुजारी,नारायण पुजारी, श्रीराम पुजारी, भिकाजी पुजारी, सत्यवान हेदळकर यांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom