काळबादेवी देवस्थानचे मानकरी श्री दत्तू धुरी यांच्या हस्ते शुभारंभ
धुरी कुटुंबीयांचा सातत्याने पाठपुरावा ; माजी बांधकाम सभापती मंदार केणी व माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांचे प्रयत्न
मालवण : मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिर समोरील पाणंद काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ काळबादेवी देवस्थान चे मानकरी श्री दत्तू धुरी यांच्या हस्ते करण्यात आला.

मेढा काळबादेवी मंदिर समोरील पाणंद काँक्रीटीकरण करून मिळावी यासाठी येथील धुरी कुटुंबीय सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या मागणीला सत्यात उतरविण्यासाठी माजी बांधकाम सभापती मंदार केणी व माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांनी प्रयत्न केले. येथील नागरीकांना दिलेला शब्द पूर्ण केला. मंदार केणी व दर्शना कासवकर यांच्या राजकीय कारकिर्दीत धुरी कुटुंबियांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. आज प्रत्यक्षात या कामाचा शुभारंभ करत कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राजा इब्राहिमपूरकर हे उपस्थित होते. येथील नागरीकांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत माहिती मंदार केणी यांनी दिली.

