गोठणे गावात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न
गोठणे शाखाप्रमुख पदी प्रभुराम घाडीगांवकर, उपशाखा प्रमुखपदी महेश साटम यांची नियुक्ती
मालवण : गोठणे उपसरपंच पदी नियुक्ती झालेले प्रथमेश घाडीगांवकर यांचे माजी सभापती सुनील घाडीगांवकर, शिवसेना तालुका चिटणीस मकरंद राणे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गोठणे येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक माजी सभापती सुनील घाडीगांवकर, शिवसेना तालुका चिटणीस मकरंद राणे यांच्या प्रमुखr उस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.

गोठणे शाखाप्रमुख पदी प्रभुराम घाडीगांवकर, उपशाखा प्रमुखपदी महेश साटम, गणेश महाडिक, नारायण हाटले, गजानन हाटले मधुकर हाटले, तुषार हाटले, सुजय हाटले, संजय महाडिक, जनार्दन हाटले, वसंत हाटले, श्रीरंग हाटले, राजू जगताप, अरुण घाडीगांवकर, प्रभाकर घाडीगांवकर, बबलू घाडीगांवकर, विनोद घाडीगांवकर, प्रकाश घाडीगांवकर, देवेंद्र घाडीगांवकर, राजाराम घाडीगांवकर, विजय हाटले, गंगाधर घाडीगांवकर, सागर घाडीगांवकर, साहिल घाडीगांवकर, विजय घाडीगांवकर, कृष्णा घाडीगांवकर, कुवरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

