Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पर्यटन नगरी मालवण शहरात अस्वच्छता व असुविधा..

पर्यटन नगरी मालवण शहरात अस्वच्छता व असुविधा..

मनसे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांची प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी

मालवण : पर्यटन नगरी मालवण शहरातील असुविधा बाबत मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाचे शहरातील स्वच्छता व पर्यटन सेवा सुविधा याबाबत योग्य लक्ष नसल्याचा आरोप मनसेचे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांनी केला आहे.

मालवण हे कोकण किनारपट्टीवरील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर लाखो पर्यटकांना आकर्षित करते. मात्र शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी अस्वच्छता आहे. सेवा सुविधा यांची कमी आहे. त्यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मालवण शहरातील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचलेले दिसून येतात, ज्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर मोकाट गुरांनी रस्त्यांवर ठाण मांडल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सागर जाधव यांनी केला आहे. 'स्वच्छ मालवण, सुंदर मालवण' चा नारा केवळ कागदावरच राहिला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शहरातील पर्यटन स्थळांचीही दयनीय अवस्था आहे. रॉक गार्डनमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली टॉय ट्रेन गायब झाली आहे. यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत आहे. तसेच, चिवला बीच आणि ऐतिहासिक राजकोट किल्ल्यासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी एकही योग्य चेंजिंग रूम किंवा स्वच्छतागृह (वॉशरूम) नाही. त्यामुळे विशेषतः महिला पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

बंदर जेटी आणि मासळी बाजाराचीही अवस्था फारशी चांगली नाही. या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून, यामुळे नागरिक व पर्यटकांमध्ये नाराजी वाढत आहे. पर्यटनातून शहराला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानाही, प्रशासनाकडून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

मनसेचे शहराध्यक्ष सागर जाधव यांनी या सर्व प्रश्नांवरून मालवण प्रशासनावर निशाणा साधला आहे. "लाखो पर्यटकांना आपण हेच अस्वच्छ आणि अव्यवस्थित मालवण दाखवतोय का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जर प्रशासनाने यावर वेळीच लक्ष दिले नाही, तर पर्यटन हंगामात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटू शकते आणि याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होईल."

यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास मालवणची प्रतिमा आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असेही सांगण्यात आले.

rapan bottom