कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्यां सुटणार
मालवण : दांडी येथील दांडेश्वर मंदिर परिसरात वारंवार कमी दाबाची वीज समस्या होती. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून वीज वितरणने याठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसवला आहे. याबाबत माहिती भाजपा मालवण शहर तालुका उपाध्यक्ष संमेश परब यांनी दिली आहे.
मालवण दांडी किनारपट्टी वरील श्री दांडेश्वर मंदिर परीसरात वारंवार वीज समस्या भेडसावत होती. कमी दाबाचा वीज पुरवठा मुळे नगरींक त्रस्त होते. याबाबत भाजपा जिल्हा चिटणीस माजी नगरसेविका सेजल परब, शहर तालुका अध्यक्ष बाबा मोडकर, भाजपा शहरतालुका उपाध्यक्ष संमेश परब, महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेवक पंकज सादये यांनी केलेल्या मागणी पाठपुराव्यातून हा प्रश्न सुटला. याबाबत जयवंत फर्नांडिस, सूरज लोणे, संतोष राऊळ, रामा धूरत, उत्कर्ष आचरेकर यांसह परिसरातील स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.

