मालवण : ग्रामपंचायत कार्यालय किर्लोस येथे मुख्यमंत्री समुद्ध पंचायतराज अभियानचे औचित्य साधून १५ वा वित्त आयोग अंतर्गत महिलासाठी मेणबत्ती व अगरबत्ती बनविणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

यावेळी सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, ग्रामपंचायत सदस्य प्रविण घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण, नूतन घाडीगावकर, मानसी भावे, सुनिता चव्हाण, श्रद्धा गावडे ग्रामपंचायत अधिकारी दत्तप्रसाद रावले, ग्रा. प. कर्मचारी, बचत गट ग्रामसंघ अध्यक्ष सौं सुप्रिया भावे, सीआरपी गायत्री चव्हाण, आशा वर्कर समिशा लाड, किर्लोस गावठाण जि प शाळा मुख्याध्यापिका राणे मॅडम, गावचे प्रतिष्ठित नागरिक अर्जुन दत्ताराम लाड, प्रशिक्षक सुभाष बाबुळकर यांचे मोलाचे सहकार्य मिळले आहे. प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
▪️अमित खोत | मालवण

