Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात 1 कोटी 35 लाख निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात 1 कोटी 35 लाख निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पाठपुरावा

शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर व शहर संघटक राजू बिडये यांची माहिती

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2025-26 करता नगरोत्थान महाअभियान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात 1 कोटी 35 लाख निधी मंजूर झाला आहे. यात 8 विकासकामाना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर व शहर संघटक राजू बिडये यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असल्याचे सांगत दिपक पाटकर, राजू बिडये यांनी आभार व्यक्त केले आहेत.

मंजूर निधी व विकासकामे

▪️चीवला बीच धुरीवाडा कुरण ते राणेसाहेब नीलरत्न बंगला पर्यंत पथदीप बसविणे. (10 लाख)

▪️मालवण दांडी शहर खराडे मार्ग ते सामंत रीसोर्ट पर्यंत संरक्षणभिंत आणि रस्ता दुभाजक व्हाळी करून बांधकाम करणे. (10 लाख)

▪️चिवला बीच नीलरत्न बंगला ते नाथ पै सेवांगण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे. (25 लाख)

▪️चिवला बीच कुरण ते नाथ पै सेवांगण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे. (25 लाख)

▪️मालवण शहर पिंपळपार लौकिक हॉटेल ते मौनी नाथ मंदिर राजकोट किनारपट्टीपर्यंत अस्तित्वातील गटारावर लादी बसविणे. (25 लाख)

▪️मालवण शहर फोवकाडा पिंपळपार येथे सेल्फी पोइंट उभारणे व कारंजा पूर्ववत सुरु करणे. (20 लाख)

▪️मालवण शहर बसस्थानक परिसर मध्ये ऐतिहासिक पोइंट उभारणे. (10 लाख)

▪️देऊळवाडा येथे अद्ययावत गणेश घाट बांधणे. (10 लाख )ही कामे मंजूर झाली आहेत.

अमित खोत | मालवण

rapan bottom