Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

संविधानिक हितकारिणी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग : साळगाव (ता. कुडाळ) येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्यावर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी संविधानिक हितकारिणी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सदर घटना अत्यंत गंभीर असून सार्वजनिक पदावर कार्य केलेल्या व्यक्तीकडून अशी जातीय वागणूक होणे हा समाजासाठी धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे कायद्याच्या अधीन राहून तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महासंघाने पुढे नमूद केले आहे की, अलीकडच्या काळात काही राजकीय प्रतिनिधींकडून अट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोगाचा मुद्दा पुढे करून मागासवर्गीय समाजाविरुद्ध नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. यामुळे समाजात जातीय तणाव वाढण्याची शक्यता असून अशा प्रकारची विधाने आणि हालचालींना आळा घालणे आवश्यक असल्याचे महासंघाने म्हटले आहे. या घटनेचा निषेध करत महासंघाने ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची मागणीही केली आहे. यावेळी महेश परुळेकर (जिल्हाध्यक्ष, संविधानिक हितकारिणी महासंघ), गौतम खुडकर (महासचिव), विनोद कदम (निमंत्रक), सुशील कदम (उपाध्यक्ष) आणि किरण जाधव (निमंत्रक) उपस्थित होते.

rapan bottom