Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार

कुडाळ व मालवण तालुक्यात 'क' वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर

मालवण : कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १७ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ८० लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे.

यात घावनळे येथील श्री. स्वामी समर्थ मठ परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नेरूर कविलकाटे श्री. साई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, सोनवडे तर्फ कळसुळी श्रीकृष्ण मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, मोरे येथील श्री देवी माऊली मंदिर परिसर सुशोभीकरण करणे-५ लक्ष, श्री कलेश्वर मंदिर नेरूर येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविणे- ५ लक्ष, बिबवणे श्री देव गिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देवी सिद्ध सातेरी मंदिर आंजिवडे परिसर सुशोभीकरण करणे-५ लक्ष, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर आवळेगाव परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, पांग्रड येथील श्री देव स्वयंभु महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ५ लक्ष, हळदीचे नेरूर श्री देव जटाशंकर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ५ लक्ष एवढा निधी कुडाळ तालुक्यातील मंदिर व धार्मिक तीर्थक्षेत्र परिसर विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे.

तर मालवण तालुक्यातील बुधवळे मिर्लेश्वर भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, गुरामनगरी श्री देव लिंगेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, देवली भगवती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देव लिंगेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे- ५ लक्ष, असगणी रामेश्वर पावणाई देवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, श्री देव जैन ब्राम्हण मांडवीर मंदिर पाणलोस येथे सुशोभिकरण करणे- ५ लक्ष या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

धार्मिक तीर्थक्षेत्र विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 'क' वर्ग पर्यटन अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीप्ती पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख दीपक नारकर, विनायक राणे शिवसेना मालवण तालुका प्रमुख विनायक बाईत, राजा गावडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

▪️अमित खोत | मालवण

rapan bottom