भाजपा मालवण शहर तालुकाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण : मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष पद आरक्षण तसेच नगरसेवक पदासाठी पडलेल्या आरक्षणाचा विचार करता हे आरक्षण शतप्रतिशद मालवण भाजपासाठी सकारात्मक आहे. असा विश्वास भाजपा मालवण शहर तालुकाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.
मागील नगरपरिषद निवडणुकीत 100 वर्षात पाहिल्यादा भारतीय जनता पार्टीचे 5 नागरसेवक निवडून आले. उपनगराध्यक्ष तसेच बांधकाम सभापती, महिला, आरोग्य सभापतींच्या माध्यमातून मालवण शहराच्या शाश्वत विकासासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले.
भाजपाचे माजी नगरसेवक तसेच मधल्या काळात झालेल्या भाजपा पक्ष प्रवेशनंतर 13 माजी नागरसेवक भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता पडलेले आरक्षण भाजपा मालवणसाठी साकारात्कम आहे. खासदार नारायण राणे साहेबाच्या माध्यमातून या भागाचा कमळ निशाणीवर पहिला खासदार भाजपा म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकित भाजपा संघटन कौशल्याने महायुतीचे आमदार निलेश राणे विजयी झाले. मालवण भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून हा सकारात्मक अहवाल भाजपा जिल्हाध्यक्ष यांना पाठवला आहे.
मालवण शहरात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेशजी राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा राज्य व केंद्र सरकारचा तसेच जिल्हा नियोजन, खासदार निधी या माध्यमातून प्राप्त झाला आहे. मालवण शहरातील जनतेस अपेक्षित विकास कार्य होत असून शहरातील जनता भारतीय पार्टी सोबत राहील याचा विश्वास आहे. असे बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले.

